Bhopal News मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळ येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही तरुण बेधडकपणे रस्त्याच्या मधोमध कार आणि स्कूटरमधून स्टंटबाजी करताना दिसतात. त्यांना स्वतःच्या किंवा इतर लोकांच्या जीवाची पर्वा नसते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण रस्त्याच्या मधोमध चालत्या गाडीच्या छतावर उभा असताना हातात सिगारेट घेऊन स्टंट करताना आणि डान्स करताना दिसत आहे. एका प्रवाशाने त्याच्या मोबाईलवरून व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
त्या गाडीत त्याचे काही मित्र बसलेले दिसतात. हा तरुण खुलेआम वाहतूक नियमांची पायमल्ली तर करत आहेच, पण त्याच्या जीवाशीही खेळत असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. याआधीही शहरातील रस्त्यावर कार आणि दुचाकीने स्टंटबाजीच्या घटना घडल्या आहेत. या घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनीही कारवाई केली आहे.