तरुणीने दोन मित्रांसह केले महिलेचे लैंगिक शोषण

आता पर्यंत पुरूष महिलांवर अत्याचार करत असल्याच्या घटना ऐकू येत होत्या परंतू आता दिल्ली येथे एका तरुणीने आपल्या मित्रांसह एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बातमी कळली आहे.
 
दिल्लीच्या सीमापुरी क्षेत्रात घडलेल्या या घटनेत व्यवसायासाठी ओळख पटवून पीडितावर अत्याचार करण्यात आला. पीडित महिला स्वत:चा व्यवसाय सुरू करू बघत होती. या दरम्यान तिची ओळख दोन तरुण व एका तरुणीशी झाली. त्या तिघांनी पार्टनरशिपमध्ये ऑनलाईन कपडे विक्री करण्याचा व्यवसाय करण्याबदद्ल योजना आखली. व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येकी दीड लाख रुपये खर्च येईल असे सांगितल्यावर महिला तयार झाली व त्यांच्या बोलवण्यावर दिलशाद कॉलनीतील एका फ्लॅटवर दीड लाख रुपये घेऊन पोहचली.
 
परंतू तिथे पोहचल्यावर तिघे तिच्यासोबत असभ्य वर्तन करू लागले. त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे तरुणीनेही महिलेवर सेक्स टॉयज वापरत अत्याचार केले. एवढे करूनही मन भरले नाही तर तिला डांबून ठेवले व अनेक दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार करत राहिले.  
 
अखेर एक दिवशी महिलेने कशीबशी स्वत:ची सुटका करत पोलीस ठाणे गाठले. यातील दोन आरोपी फरार असून एकाला अटक करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती