दिल्ली पोलिसांच्या एका महिला उपनिरीक्षकावर वृद्ध सासऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. प्रकरण लक्ष्मीनगर भागातील आहे. येथे महिला उपनिरीक्षकाने स्थानिक पोलिसांसमोर वृद्ध सासऱ्याला बेदम मारहाण केली. स्थानिक पोलीस प्रेक्षक बनून बघत राहिले, पण कोणतीही कारवाई केली नाही. मारहाणीची ही संपूर्ण घटना घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.