या प्रकारे सुरुवात: हिरे व्यवसायातील धडे शिकवण्यासाठी 19 वर्षाच्या वयात मोदीला त्याच्या मामा आणि गीतांजली जेम्सचे चेयरमॅन मेहुल चोकसी यांच्याकडे मुंबईला पाठवण्यात आले. 1999 साली त्यांनी दुर्लभ हिर्याच्या व्यापारासाठी फायरस्टार डायमंड नामक कंपनी स्थापित केली आणि बघता-बघता अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे अधिग्रहण केले. आज त्यांचे ज्वेलरी स्टोअर लंडन, न्यूयॉर्क, लास वेगास, हवाई, सिंगापूर, बीजिंग सारख्या 16 शहरांमध्ये आहे. भारतात दिल्ली आणि मुंबईत त्यांचे स्टोअर आहे. याच मजबूत नेटवर्कमुळे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात पाऊल ठेवले. भारताव्यतिरिक्त त्यांची रूस, अर्मेनिया आणि दक्षिण आफ्रिका मध्येही मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहे.