20 वर्षांपासून होता बेपत्ता, व्हाट्सएपने मिळवले, शिकले 8 भाषा

सोमवार, 7 जानेवारी 2019 (12:42 IST)
कर्नाटकात एका व्हाट्सएप मेसेज ने 48 वर्षीय व्यक्तीला त्याच्या परिवाराशी 20 वर्षांनंतर भेटवले. या व्यक्तीचे नाव महावीर सिंह चौहान आहे. तो मूळ राजस्थानच्या  जालौर जिल्ह्याच्या झाब गावाचा राहणारा आहे. त्याने इतक्या वर्षांनंतर आपले 24 वर्षीय मुलगा प्रद्युमनशी नीमहंस दवाखान्यात भेट घेतली. प्रद्युमन त्या वेळेस फक्त 4 वर्षांचा होता जेव्हा त्याने आपल्या वडिलांना शेवटचे बघितले होते. तसेच प्रद्युमनचा लहान भाऊ रघुपालचे वय त्या वेळेस फक्त एक वर्ष एवढे होते.  
 
म्हणून पळाला होता घरातून  
 
महावीर मुंबईत बिझनेस करत होता. जेव्हा त्याला बिझनेसमध्ये तोटा झाला होता तर त्या वेळेस त्यांनी आपल्या कुटुंबाशी सर्व संबंध तोडून घेतले होते. त्याने लाजेखातर डिसेंबर, 1998 ला आपले घर सोडून दिले होते. महावीराचे वडील गणपत सिंह चौहान आणि कुटुंबातील इतर लोकांनी त्याचा शोध घेणे सुरू केले व पोलिसात तक्रार देखील नोंदवली. पण पाच वर्षापर्यंत महावीरचा काही पत्ता लागला नाही तर त्यांनी देखील हार मानून घेतली. महावीर बंगलूरू आला आणि मागील 20 वर्षांपासून येथेच राहत आहे.  
 
तो शनिवारी रोस फर्ममध्ये बेशुद्ध पडलेला मिळाला. तेथे तो सुपरवाइजरचा काम करत आहे. त्यानंतर महावीराचे मित्र त्यांना स्थानीय दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी तेथून महावीराला नीमहंस दवाखान्यासाठी रेफर केले.  
 
महावीरचा एक मित्र बंगलूरूमध्ये फोटोग्राफीचे काम करतो व तो देखिल राजस्थानचा आहे. त्याचे म्हणणे आहे की त्याला महावीरकडून एवढ्या वर्षांमध्ये फक्त एवढेच ऐकायला मिळाले की त्याचे लग्न झाले आहे आणि घरी दोन मुलं, बायको व वडील आहे.  
 
जेव्हा महावीराची स्थिती खराब होऊ लागली तेव्हा त्याच्या मित्रांना असे वाटू लागले की अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाचे त्याच्याजवळ असणे गरजेचे आहे. त्यांनी महावीरचा फोटो आणि त्याचा ड्राइविंग लाइसेंस व्हाट्सएपवर पोस्ट केला ज्याला बर्‍याच राजस्थानी ग्रुपवर शेयर करण्यात आले.   
 
त्यानंतर महावीरच्या मित्रांना एका नंतर एक फोन आणि मेसेज येऊ लागले. त्यांना नंतर महावीरचा मुलगा प्रद्युमनचा फोन देखील आला. प्रद्युमनने म्हटले की तो  बंगलूरूसाठी फ्लाईट घेऊन लवकरच येत आहे. प्रद्युमनने दवाखान्यात आल्याबरोबर आपल्या वडिलांचे चरण स्पर्श केले. महावीरने आपल्या मुलाला म्हटले, "आज मी आपल्या सर्व अपराधांपासून मुक्त झालो आहे, मला त्याच जागेवर घेऊन चला जेथे माझे संबंध आहे."
 
प्रद्युमनचे म्हणणे आहे की नियती देखील किती रहस्यमय पद्धतीने आपले काम करते. त्याने म्हटले की त्याच्या आईला नेहमी वाटायचे की त्याचे वडील परत येतील आणि असे झाले देखील. बाकी सर्वांना वाटत होते की आम्ही त्यांना गमावून दिले आहे. आता त्यांना लवकरच राजस्थान घेऊन जाण्यात येईल.  
 
20 वर्षांमध्ये परिवार तर गमावला पण काय शिकले  
 
महावीर 20 वर्षांपर्यंत आपल्या कुटुंबीयांशी दूर राहिला. या 20 वर्षांमध्ये त्याने 8 भाषा शिकली. तो मराठी आणि कन्नड भाषा चांगल्या प्रकारे बोलू शकतो. महावीरच्या मित्रांनी ही बाब सांगितली. त्यांनी म्हटले की महावीराने फर्ममध्ये ड्राइवर, फोटोग्राफर, माली, सेल्समॅन आणि सुपरवाइजर म्हणून काम केले.    
 
महावीरच्या मित्रांनी सांगितले की महावीरने निर्णय घेतला होता की तो कधीपण आपल्या परिवाराजवळ जाणार नाही पण मागील 3 वर्षांपासून त्याला आपल्या परिवाराबद्दल प्रेम निर्माण झाले होते. त्याने एक इतर नावाने सोशल मीडियावर अकाउंट बनवले होते आणि आपल्या मुलांना फॉलो करत होता. बर्‍याच वेळा परिवाराशी भेटण्याची इच्छा देखील दर्शवली होती.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती