पश्चिम बंगाल विधानसभेत कृषी कायद्याविरोधात प्रस्ताव संमत

शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (23:21 IST)
केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या विधानसभेत प्रस्ताव संमत करण्यात आला. कृषी कायद्याविरोधात प्रस्ताव संमत करणारं पश्चिम बंगाल सहावं राज्य ठरलं आहे.
 
कृषी कायद्याविरोधात प्रस्ताव संमत करण्यासाठी पश्चिम बंगाल विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. विधानसभेत प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर सदस्यांकडून गोंधळ घालायला सुरुवात झाली.
 
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सदस्यांनी विधानसभेतून सभात्याग केला. डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी या प्रस्तावाला समर्थन दिलं. गदारोळातच कृषी कायद्याविरोधातील प्रस्ताव संमत करण्यात आला.
 
आंदोलक शेतकऱ्यांना आमचं समर्थन आहे, असं ममता बॅनर्जी यांनी प्रस्ताव संमत झाल्यानंतर सांगितलं. प्रस्ताव सादर झाल्यानंतर भाजप सदस्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती