Waqf Bill: लोकसभेत सुमारे १२ तास चाललेल्या चर्चेनंतर गुरुवारी दुपारी १:५६ वाजता वक्फ कायदा, २०२५ आणि मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक, २०२४ मंजूर करण्यात आले. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केलेले हे विधेयक २८८ मतांनी आणि २३२ विरोधात मंजूर झाले. आता ते राज्यसभेत पाठवले जाईल.
तसेच वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन आधुनिकीकरण करणे, कायदेशीर वाद कमी करणे आणि पारदर्शकता आणणे या उद्देशाने वक्फ कायदा, १९९५ (२०१३ मध्ये सुधारित) मध्ये जवळजवळ ४० सुधारणा प्रस्तावित करण्यात आल्या. देशात वक्फ मालमत्तेवरून वारंवार वाद होत आहे. यामुळे कायदेशीर लढाई आणि समुदायाची चिंता देखील निर्माण झाली आहे. सरकारने सांगितले की, सप्टेंबर २०२४ च्या आकडेवारीनुसार, २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वक्फ बोर्डांमध्ये ५९७३ सरकारी मालमत्ता वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आल्या आहे. केंद्र सरकारलाही याबाबत सतत तक्रारी येत आहे.