एलजी पॉलिमर कंपनीतून विषारी वायू गळती झाली. ज्यामुळे आसपासच्या तीन किलोमीटर अंतरावरील परिसरावर याचा परिणाम जाणवला. ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावं रिकामी केली आहेत. एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.