कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी माल्याला दोषी

मंगळवार, 9 मे 2017 (17:11 IST)

कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी विजय माल्याला सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी त्याला 10 जुलैला न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत. बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेला विजय माल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयाकडे मागणी केल्यानंतर मुंबईच्या विशेष न्यायालयाने माल्याला फरार म्हणून घोषित केले आहे. तसेच माल्याचा पासपोर्टही जप्त करण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालय 10 जुलैला विजय मल्ल्याला शिक्षा सुनावणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा