भाजपाने केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपाध्यक्ष अमित शाहा यांनी व्यंकय्या नायडूंच्या नावाची घोषणा केली आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. व्यंकय्या नायडू लहानपणापासूनच भारतीय जनता पक्षाचं काम करत आलेत, व्यंकय्या नायडूंना 25 वर्षांच्या संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. एनडीएच्या घटकपक्षांनीही व्यंकय्या नायडूंच्या नावाला सहमती दर्शवली आहे, असंही अमित शाह यांनी सांगितले आहे.