बुलंद शहर येथील साधूंच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली चिंता

बुधवार, 29 एप्रिल 2020 (08:47 IST)
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशीही फोनवर बातचीत
उत्तर प्रदेशमधल्या बुलंद शहर येथे दोन साधूंच्या झालेल्या हत्येबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलून चिंता व्यक्त केली.
 
या अशा अमानुष घटनेविरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राने अशा स्वरूपाच्या घटनेमध्ये ज्या रितीने तातडीने कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे बुलंद शहर प्रकरणीदेखील दोषींना कडक शिक्षा होईल अशी  अपेक्षा व्यक्त केली आहे. कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती