काय सांगता, महिलेच्या पोटातून बाहेर काढला दोन किलो केसांचा गुच्छ

शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 (19:02 IST)
बरेलीच्या एका जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या रुग्णालयात एका 31 वर्षीय महिलेवर शस्त्रक्रिया करून दोन किलो केसांचा गुच्छ काढण्यात आला असून डॉक्टर देखील हे बघितल्यावर थक्क झाले. या महिलेचे पोट सतत दुखायचे ही महिला पोटदुखीने ग्रस्त होती तिच्यावर शस्त्रक्रिया केल्यावर तिच्या पोटातून डॉक्टरांनी तब्बल 2 किलोचा केसांचा गुच्छ काढला आहे. महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. 
 
समुपदेशनादरम्यान महिला ट्रायकोटोमॅनिया नावाच्या मानसिक विकाराने ग्रस्त असल्याचे समोर आले
मिळलेल्या माहितीनुसार, महिलेला पाच वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होत होता.

कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयाच्या फेऱ्या मारल्या दोन लाख रुपये खर्च करून देखील काहीच सुधारणा नव्हती.अखेर त्यांनी जिल्हा रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी तिचे सिटी स्कॅन करायला सांगितले त्यात पोटात गाठ दिसली 22 सप्टेंबर रोजी डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल केले असून 26 सप्टेंबर रोजी तिच्या पोटावर शस्त्रक्रिया करून पोटातून 2  किलोचे केसांचे गुच्छ काढले. 

तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञाने समुपदेशन केल्यावर महिलेने वयाच्या 16 व्या वर्षांपासून ती केस खात असल्याचे सांगितले. महिला ट्रायकोटोमॅनिया या मानसिक विकाराने ग्रस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती