पश्चिम बंगालच्या हावडाममध्ये राहणा-या इशरत जहाँ यांनी गुरुवारी हावडाच्या गोलाबारी पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदविली आहे. दरम्यान, तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर इशरत जहाँ यांनी आपल्याला सासरच्या मंडळींकडून आणि शेजा-यांकडून धमकीचे फोन आल्याचे म्हटले होते. सध्या इशरत जहाँ हावडाच्या पिलखाना भागात आपल्या चार मुलांना घेऊन राहतात. इशरत जहाँ यांना 2014 मध्ये त्यांच्या नव-याने दुबईहून फोनवरुन तलाक दिला होता. तिहेरी तलाक विरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाच प्रमुख महिलांमध्ये इशरत जहाँ यांच्यासह शायरा बानो, आफरीन रहमान, अतिया साबरी, गुलशन परवीन यांचा समावेश आहे.