ट्रिपल तलाकवर सुनावणी पुर्ण, निकाल राखून ठेवला

गुरूवार, 18 मे 2017 (16:38 IST)
ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर 11 मे पासून सुरु असलेली सुनावणी पुर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी आपला निकाल राखून ठेवला आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सहा दिवस युक्तीवाद चालला. सुनावणीदरम्यान मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने महिलांचं म्हणणं जाणून घेण्याचं आश्वासन दिलं आहे. केंद्र सरकारकडून तिहेरी तलाकविरोधात महाधिवक्ता मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. तर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला.

वेबदुनिया वर वाचा