उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात, 'रील'साठी स्टंट करून व्हिडिओ बनवणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाने एका बाईकला धडक दिली. या घटनेत दुचाकीवरून जाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र जखमी झाला.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा विद्यार्थी त्याचा मित्रसह झांझर गावातील इंटर कॉलेजमधून हायस्कूल परीक्षेचे प्रवेशपत्र घेण्यासाठी दुचाकीवरून जात होता. रबुपुरा पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर यांनी सांगितले की, दोन ट्रॅक्टर चालक रस्त्यावर स्टंट करत होते आणि रीलसाठी व्हिडिओ बनवत होते, तेव्हा एका ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. त्यांनी सांगितले की, या घटनेत दुचाकीस्वार विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमोर्टमसाठी पाठवला. घटनेनंतर आरोपी चालक घटनास्थळावरून पळून गेला, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर जप्त केला आहेव आरोपी चालकाचा शोध सुरू करण्यात आला आहे.