अमृतसरच्या सुवर्णमंदिरात Tik Tok चित्रीकरणास बंदी

सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (10:43 IST)
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने अमृतसरच्या सुवर्णमंदिरात टिकटॉक व्हिडिओ चित्रीकरणास बंदी घातली आहे. सुवर्णमंदिरात नाचत-गात टिक टॉक व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
 
हा निर्णय देणार्‍या समितीने मंदिर परिसरात पोस्टर देखील लावले आहे. ज्यात भाविकांना येथे टिक टॉक व्हिडिओ न काढण्याची चेतावणी देण्यात आली आहे. लोकांनी हरमिंदर साहिब येथे टिकटॉक चित्रफितींचे चित्रीकरण करू नये, असे त्यात म्हटले आहे.जर लोक टिकटॉक चित्रीकरण करणार असतील तर तेथे मोबाइलला बंदी घालावी, असे मत अकाल तख्तचे प्रमुख धर्मगुरू ग्यानी हरप्रीत सिंग यांनी व्यक्त केले.
 
अमृतसरमधील सुवर्णमंदिरात येणारे भाविक हे काही वेळा गाणी लावून नृत्य करीत टिकटॉक चित्रफिती तयार करतात, असे दिसून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती