ओमिक्रॉन डेल्टापेक्षा तीनपट संसर्गजन्य, गरज पडल्यास नाईट कर्फ्यू लावा, केंद्राचं राज्यांना पत्र

बुधवार, 22 डिसेंबर 2021 (19:40 IST)
कोरोनाचा नव्यानं समोर येत असलेला ओमिक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेमध्ये तीन पटीनं अधिक संसर्गजन्य असल्याचं केंद्रीय आरोग्य सचिवांनी म्हटलं आहे.
 
याला वेळीच आवर घालण्यासाठी सर्व राज्यांनी पावलं उचण्याचं आवाहन केंद्र सरकारनं पत्र लिहून केलं आहे. राज्यांनी यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या. गरज पडल्यास नाईट कर्फ्यूसारखे निर्णय घ्यावे असं केंद्रानं म्हटलं आहे.
 
कोरोनासाठीच्या वॉर रुम पुन्हा सक्रिय करून परिस्थितीवर नजर ठेवण्यास राज्य सरकारनं सांगितलं आहे. तसंच मोठ्या सभा, विवाह सोहळे, अंत्यसंस्कार यावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
पुढील काही दिवसांत नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने विविध पार्ट्यांचे आयोजन होणार आहे. त्यावरही राज्यांना करडी नजर ठेवावी लागणार आहे.
 
राज्यातील आकड्यांचा अभ्यास करून स्थानिक प्रशासनानं कंटेनमेंट झोन तयार करणं किंवा तशा प्रकारची पावलं उचलण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिला आहे. आजतकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती