मोबाईल न दिल्याने तरुण मुलाने जीवन संपवले

शनिवार, 2 फेब्रुवारी 2019 (11:38 IST)
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोबाईल गेम आणि त्याचे व्यसन यावर तरुण मुलांचे प्रबोधन केले होते. हे ताजे असतांना एका मुलाने मोबाईल नवीन घेतला नाही म्हणून आत्महत्या केली आहे. मुंबई येथील कुर्ला परिसरातील नेहरू नगर भागात खळबळजनक घटना घडली. महागडा मोबाईल घेऊ न दिल्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. नदीम शेख (19) असं या तरुणाचं आहे. नेहरू नगर परिसरात राहणाऱ्या नदीमला नवा मोबाईल विकत घेण्यासाठी त्याच्या मोठ्या भावाने 20 हजार रुपये दिले होते. मात्र, नदीमला 37 हजार रुपयांचाच मोबाईल पाहिजे होता. महागडा मोबाईल घेण्यास भावाने देखील अटकाव केला. त्यामुळे निराश झालेल्या नदीमने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी नेहरू नगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोबाईल हे जीवन नाही, तो नसेल तर फरक पडत नाही सोबतच त्यामुळे कोणतेही काम अडत नाही असे अनेकदा डॉक्टर सांगतात मात्र तरीही तरुण पिढी या मोबाईल मुळे आपला जीव देते असे समोर येते आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती