माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 'एक राष्ट्र, एक निवडणूक' या मुद्द्यावर 62 पक्षांशी संपर्क साधला होता आणि प्रतिसाद देणाऱ्या 47 राजकीय पक्षांपैकी 32 पक्षांनी एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या कल्पनेला पाठिंबा दिला, तर 15 पक्षांनी विरोध केला. हे अहवालानुसार, एकूण 15 पक्षांनी प्रतिसाद दिला नाही
यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सांगितले होते की, भाजपच्या नेत्तृत्वाखाली एनडीए सरकार सध्याच्या कार्यकाळात वन नेशन वन इलेक्शन लागू करेल. हे आश्वासन भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या जाहीरनाम्यात दिलेल्या प्रमुख आश्वासनांपैकी एक आहे.