काँग्रेसची 'ही' सहा नावे निश्चित

बुधवार, 30 जानेवारी 2019 (10:06 IST)
लोकसभा निवडणुकीसाठी नांदेडसह, सोलापूर, यवतमाळ, वर्धा, धुळे आणि दक्षिण मुंबई मतदारसंघातील उमेदवाराची नावे काँग्रेससंसदीय मंडळाच्या  झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आली. नांदेडमधून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी आ.अमिता चव्हाण यांच्या नावाची पक्षश्रेष्ठींकडे शिफारस करण्यात येणार आहे.
 
टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा समित्यांकडून आलेल्या नावांवर चर्चा झाली. या चर्चेअंती नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्या पत्नी आ. अमिता चव्हाण, सोलापुरातून सुशिलकुमार शिंदे, यवतमाळमधून माणिकराव ठाकरे, वर्धा येथून चारूलता टोकस, धुळ्यातून रोहिदास पाटील आणि दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांच्या नावाची दिल्लीतील केंद्रीय समितीकडे शिफारस करण्याचा निर्णय झाला. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात आला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती