यासंदर्भात N C E R T चं कृतीदल विद्यापीठ अनुदान आयोगाच्या देखरेखीखाली दिशानिर्देश तयार करत आहे अशी माहिती त्यांनी दिली. नवीन शैक्षणिक धोरण वैज्ञानिक वृत्ती आणि संशोधनाचा पाया घालणारं असेल असं निशंक म्हणाले. ९ वी आणि ११ वीच्या परीक्षांमध्ये यंदा अनुत्तीर्ण झालेल्यांना पुन्हा एकदा शाळेची परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी सीबीएसईनं दिली आहे. ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना यापूर्वीच कुठल्याही परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात पाठविण्यात आले आहे.