तालिबानबाबत भारत सरकारचा दृष्टिकोन बदलला, चर्चेचे संकेत - सूत्र

बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (13:09 IST)
भारत सरकारचा दृष्टीकोन तालिबान बाबत बदलताना दिसत आहे.सरकार ने तालिबान सोबत वार्ता करण्याचे संकेत दिले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,भारत सरकार आता तालिबान सोबत वार्ता करण्यास तयार झाली आहे.देशाच्या हिताचे लक्षात घेऊन ज्या पक्षाची बोलणे करायचे आहे त्यांच्याशी संपर्क केला जाईल.या पूर्वी देखील सरकारने तालिबानशी संपर्क करण्याचे नाकारले नव्हते.
 
हा संपर्क कशा प्रकारचा असणार हे भविष्यात तालिबानांवर निर्भर असणार.तालिबानची वागणूक भारतासाठी कशी आहे.तालिबान भारताच्या हिताची कशी सुरक्षा करतो.
 
सध्या तालिबान ने अफगाणिस्तान मध्ये आपली सरकार चालविण्याचे प्रयत्न तीव्र सुरु केले आहेत.त्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करून जबाबदारी सोपवली जात आहे.
 
अफगाणिस्तानात तालिबान राजवटीच्या मान्यतेवर भारताने म्हटले आहे.ते पाहतील की अतिरेकी गटाचे वागणे कसे आहे.आणि इतर लोकशाही राष्ट्रे त्यावर काय भूमिका घेतात.
 
सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांच्याशी चर्चा केली आणि अफगाणिस्तानसह द्विपक्षीय, बहुपक्षीय आणि प्रादेशिक समस्यांवर चर्चा केली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती