बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालय घेणार

मंगळवार, 1 जून 2021 (08:13 IST)
बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालय घेणार आहेत. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल बारावीच्या परीक्षेसंदर्भात घोषणा करणार आहेत. बारावीच्या परीक्षांची घोषणा करण्याआधी केंद्रीय शिक्षण मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याविषयीची माहिती देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत राज्य शिक्षण मंडळाकडून आलेल्या सूचनांच्या आधारे तयार करण्यात आलेला अहवाल केंद्रीय शिक्षणमंत्री पंतप्रधानांसमोर सादर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशातील बारावीत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णय मंगळवारी केंद्रीय शिक्षण मंत्री घेणार आहेत. 
 
बारावी बोर्डाच्या परीक्षा घेण्याआधी परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट केली जाणार आहे. १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे विद्यार्थी त्याचप्रमाणे केंद्रांमध्ये नेमलेले शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. बारावी परीक्षेच्या सर्व केंद्रावर कोविड प्रोटेकॉल्सची व्यवस्था केली जाईल. त्याचप्रमाणे परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांची संख्याही कमी असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती