रील बनवण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू, 100 फूट उंचीवरून मारली होती तलावामध्ये उडी

गुरूवार, 23 मे 2024 (12:31 IST)
झारखंड मधील साहिबगंज जिल्ह्यात खबळजनक घटना घडली आहे. रील बनवण्याच्या नाद एक तरुण आपला जीव गमावून बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रील बनवून लाईक मिळतील या अपेक्षेमुळे तरुणाने 100 फूट उंचीवरून नदी पात्रात उडी घेतली. उडी घेतल्यानंतर काही क्षणांमध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. 
 
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालीत. व तरुणाच्या मृतदेहाला बाहेर काढून पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले. तसेच ही घटना साहिबगंज जिल्ह्यातील जिरवाबाडी क्षेत्रात करम पहाडाजवळ घडली आहे. इथे एक दगड खदानवर एक तलाव बनलेला आहे. हा तरुण आपल्या काही मित्रांसमवेत इथे आला होता. 
 
मित्रांना मोबाईल देऊन त्याने व्हिडीओ बनवण्यास सांगितले. व 100 फूट उंचीवरून तलावामध्ये उडी घेतली. उंचीवरून उडी घेतल्यामुळे त्याला पाण्यामध्ये दुखापत झाली व काही कळायच्या आताच त्याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. स्थानीय लोकांनी मोठ्या मुश्किलीने त्याचा मृतदेह बाहेर काढला. त्याच्या या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्याचे तरुण आणि तरुणी रील बनवून लाईक मिळतील व आपण प्रसिद्ध होऊ या अपेक्षेमुळे अनेक वेळेस आपला जीव गमावून बसतात. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती