LPG सिलेंडर लीक झाल्याने एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

गुरूवार, 23 मे 2024 (11:23 IST)
मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबाने नातेवाईकांचा फोन उचलला नाही, तर त्यांना संशय आला. मग त्यांनी शहरात असलेल्या आपल्या इतर नातेवाईकांशी संपर्क साधला आणि माहिती काढण्यास सांगितली तर भीषण सत्य समजले. 
 
कर्नाटक मधील मैसूरमध्ये यारागनहल्ली मध्ये गॅस लीक झाल्यामुळे अपघात झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदिग्ध LPG सिलेंडर लीक झाल्यामुळे बुधवारी यारागनहल्ली मध्ये एकाच घरातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, LPG लीक झाल्यामुळे या चौघांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला आहे. 
 
या कुटुंबाने जेव्हा फोन उचलला नाही म्हणून नातेवाईकांना संशय आला व त्यांनी तपास केला तर घरामध्ये या कुटुंबातील चौघेजण मृत अवस्थेत आढळले. पोलिसांनी सांगितले की, घर छोटे होते व खिडक्या बंद होत्या. ज्यामुळे या कुटुंबाचा श्वास गुदमरून मृत्यू झाला आहे . 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती