तारखेवरुन वाद
यंदा गुजरात विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात पार पडण्याची शक्यता आहे. मात्र निवडणूक तारखांवरुन सातत्याने वाद सुरु आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी 12 ऑक्टोबरला हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मात्र त्यावेळी गुजरात निवडणुकीच्याही तारखा जाहीर होतील अशी अपेक्षा होती, मात्र ती झाली नाही.
गुजरातचे रण का आहे महत्त्वाचे?
गुजरात निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. कारण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथे काँग्रेसने आव्हान दिलं आहे. त्याचमुळे नरेंद्र मोदी यांनी महिनाभरात तब्बल 5 वेळा गुजरात दौरा केला. गुजरात निवडणुकीला 2019 च्या लोकसभेची सेमीफायनल मानलं जात आहे. मोदी लाट आहे की नाही हे या निवडणुकीतून समोर येणार आहे.