विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता ठरवणार शिक्षकांची पगारवाढ

बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (10:24 IST)

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेवर शिक्षकांची पगारवाढ ठरवण्याचा निर्णय महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील शिक्षक संघटनांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

12 ते 24 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना उच्च वेतन असलेली बढती मिळण्याची हमी होती. मात्र सरकारच्या ठरावानुसार यापुढे शिक्षकांना आणखी एका निकषाला पात्र ठरावं लागणार आहे.

12 ते 24 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या प्राथमिक (इयत्ता पहिली ते पाचवी), उच्च प्राथमिक (सहावी ते आठवी) शिक्षकांना ही अट लागू असेल. राष्ट्रीय मानक आणि मूल्यमापन (शाळा सिद्धी) उपक्रमात संबंधित शाळेला अ श्रेणी मिळाली असेल, तरच शिक्षकांना उच्च वेतन असलेली बढती मिळू शकते.

दुसरीकडे शाळेतील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची कामगिरी, शैक्षणिक गुणवत्ता यासारख्या बाबींवर शाळांना मिळणारी श्रेणी अवलंबून असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती