तरुणांसाठी पंतप्रधान लिहीणार पुस्तक

परीक्षेचा ताण, भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे. तसेच परीक्षेनंतर काय करावे आदी विषयांवर तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच एक पुस्तक लिहीणार आहेत. पेंग्विन रॅन्डम हाऊस प्रकाशनच्यावतीने प्रकाशित होणारे हे पुस्तक अनेक भाषांमध्ये असेल आणि या वर्षाच्या अखेरीपर्यंत ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
 
पंतप्रधानांनी या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना अनेक विषयांवर मार्गदर्शन केले असणार आहे. विशेषतः इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे मार्गदर्शन महत्वाचे असणार आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे महत्वाच्या परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मित्र बनण्याचा प्रयत्न करणार आहेत. परीक्षेतील गुणांपेक्षा ज्ञानाला महत्व का द्यावे आणि भविष्यातील जबाबदारी कशी स्वीकारावी याबाबत मोदी अनौपचारिक आणि संवादाच्या स्वरुपात मार्गदर्शन करणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा