एलजी मनोज सिन्हा यांनी येथे येऊन आमच्या मागण्या ऐकून घ्याव्यात, अशी आमची मागणी असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दुसरीकडे, दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर आणि स्थानिक पोलिस राजौरीमध्ये शोध मोहीम राबवत आहेत.
अप्पर डांगरी भागात दहशतवाद्यांनी गोळीबार केला
एका अधिकृत निवेदनानुसार, राजौरी जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळेजवळील अप्पर डांगरी भागात संध्याकाळी 7.15 वाजता गोळीबाराची घटना घडली, ज्यात एक महिला आणि एका मुलासह 10 हून अधिक लोक जखमी झाले.
एडीजीपी मुकेश सिंह म्हणाले, “राजौरी जिल्ह्यातील अप्पर डांगरी भागात दहशतवाद्यांनी तीन घरांवर हल्ला केल्याने चार जण ठार झाले आणि सात जण जखमी झाले. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून लवकरच दहशतवाद्यांना जेरबंद केले जाईल.”