श्रीनगर मध्ये पोलिस बसवर दहशतवादी हल्ला, 3 जवान शहीद, 14 जखमी

सोमवार, 13 डिसेंबर 2021 (19:16 IST)
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी पोलीस दलावर हल्ला केला. श्रीनगरच्या जेवन भागात गोळीबाराचे आवाज ऐकू आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर गोळीबार केला. या हल्ल्यात 3 जवान शहीद झाले आहेत. तर 11 जवान जखमी झाले आहेत.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय राखीव पोलिसांच्या (IRP) 9व्या बटालियनची एक कार श्रीनगरमधील जेवानमधील पंथा चौक-खोनमोह रस्त्यावरून जात होती. दहशतवाद्यांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती