ईडीकडून राबडीदेवी, तेजस्वी यांना पुन्हा समन्स

शनिवार, 18 नोव्हेंबर 2017 (09:06 IST)
बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव या मायलेकांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुन्हा समन्स बजावले आहे. रेल्वेच्या अखत्यारीतील हॉटेलच्या देखभालीचे कंत्राट देताना झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी त्यांना चौकशीसाठी ईडीपुढे हजर रहावे लागणार आहे.
 
राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडींना चौकशीसाठी 24 नोव्हेंबरला तर लालूपुत्र तेजस्वींना त्याआधी म्हणजे 20 नोव्हेंबरला बोलावण्यात आले आहे. याप्रकरणी तेजस्वी यांची याआधी दोनवेळा चौकशी झाली आहे. तर ईडीने सहावेळा समन्स बजावूनही राबडींनी हजर राहण्याचे टाळले आहे. याप्रकरणी ईडीने याआधीच लालू आणि त्यांच्या कुटूंबातील काही सदस्यांविरोधात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्‍टच्या (पीएमएलए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती