तिस्ता सेटलवाड यांना 2 जुलैपर्यंत कोठडी

सोमवार, 27 जून 2022 (10:08 IST)
तिस्ता सेटलवाड आणि आणि माजी आयपीएस आरबी श्रीकुमार यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
गुजरातच्या अहमदाबाद क्राइम ब्रँचने दोघांनाही 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना 2 जुलैपर्यंत कोठडी दिली आहे. अहमदाबाद येथील घिकाटा येथील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी क्रमांक 11 यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. 
 
गुजरात दंगलीप्रकरणी खोटी माहिती दिल्याबद्दल तिस्ता सेटलवाड यांना गुजरात एटीएसने काल अटक केली होती. गुजरात दंगलीवरील एसआयटीच्या अहवालाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने 24 जून रोजी फेटाळून लावली होती. झाकिया जाफरी यांनी ही याचिका दाखल केली होती.
 
2002 च्या गुजरात दंगलीमध्ये झाकिया जाफरी यांचे पती एहसान जाफरी यांची जमावाने हत्या केली होती. एहसान जाफरी यांची पत्नी झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून एसआयटीच्या अहवालाला आव्हान दिले आहे. एसआयटीच्या अहवालात राज्यात मोठ्या पदावर असलेल्या लोकांना क्लीन चिट देण्यात आली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती