बसमध्ये हस्तमैथुन: तसिल्मा म्हणे बलात्कार व खूनापेक्षा चांगलं

दिल्लीतील एका बसमध्ये एका व्यक्तीने हस्तमैथुन केल्याच्या प्रकरणावर प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरिन यांनी आपले मत मांडत म्हटले की हस्तमैथुन करणं याला अपराध मानू नये. पण, नसरिन यांच्या या वक्तव्यावर ट्विटरकरांनी मात्र सहमती दर्शविली नाही. 
 
नसरिन ने लिहिले की दिल्लीत प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये एक व्यक्ती हस्तमैथुन करत होता. रेप कल्चरमध्ये याला मोठा अपराध समजला जाऊ नये. सार्वजनिक स्थळावार हस्तमैथुन करणं गुन्हा आहे का ? खरं तर हा असा गुन्हा आहे की, ज्यामध्ये कोणी पीडित नसतं. 
 
सोशल मीडियावर या वक्तव्याला मोठा विरोध होताना दिसतो आहे. एकाने लिहिले की आम्ही मॉडर्न होतो आहे, याचा अर्थ आम्ही निर्लज्ज होतो आहे असा नाही, हस्तमैथुन, शारीरिक संबंध किंवा शौच सार्वजनिक ठिकाणावर योग्य नाही, अश्याप्रकारे अनेक कमेट्स केल्या गेल्या.
 
सोशल मीडियावरील या कमेन्ट्सनंतर तस्लिमा नसरिन यांनी पुन्हा एक ट्विट केले की 'बस, ट्रेन, गर्दीची ठिकाणं, रात्र, दिवस, शाळा, ऑफिस इतकंत नाही, तर घरातही महिला सुरक्षित नाही. या सगळ्याचं कारण पुरूष आहेत. त्यांना स्त्रीयांबद्दल असलेली द्वेषाची भावना कमी करायला हवी, ज्याने अर्धी लोकसंख्या आरामात जगू शकेल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती