येत्या १ एप्रिलपासून ताजमहालचे दर्शन महागणार

ताजमहाल या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन आता महाग होणार असून  प्रवेश करण्यासाठी भारतीय नागरिकांना ५० रुपये तर विदेशी नागरिकांना १ हजार २५० रुपये मोजावे लागणार असल्याची माहिती केंद्रीय संस्कृती मंत्री महेश शर्मा यांनी दिली आहे. तसेच यामागील मूळ हेतू हा ताजमहालचे संवर्धन करणे हा असल्याचे स्पष्टीकरण देखील शर्मा यांनी दिले आहे. 
 
याचबरोबर ताज महालच्या अंतर्गतभागामध्ये जाण्यासाठी देखील यापुढे २०० रुपये वेगळे मोजावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. ताजच्या अंतर्गत भागामध्ये जाण्यासाठी एकच द्वार असल्यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. तसेच या भागाचे ऐतिहासिक महत्त्व देखील अधिक असल्यामुळे या भागाचे देखील संवर्धन होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे येतील गर्दी कमी करण्यासाठी तसेच स्थळाच्या संवर्धनाचे गांभीर्य जपणाऱ्या पर्यटकांनाचा आतमध्ये प्रवेश मिळावा यासाठी म्हणून २०० रुपयांचे अतिरिक्त स्टेट तिकीट देखील सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. हा नियम येत्या १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती