टी. एन. शेषन यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

सोमवार, 11 नोव्हेंबर 2019 (09:50 IST)
भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे, ते आपल्या भारताचे 10 वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. शेषन यांनी वयाच्या 86 व्या वर्षी चेन्नईतल्या निवासस्थानी रात्री 9.30 वाजताच्यादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. देशात आज एकही माणूस नाही ज्याला शेषन कार्ड माहित नाही असे होईल. निवडणूक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्याचं श्रेय टी .एन. शेषन यांना जाते.
 
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून शेषन हे वर्ष 1990 ते 1996पर्यंत होते. मुख्य निवडणूक आयुक्त होण्यापूर्वी त्यांनी 1989मध्ये भारताच्या 18व्या कॅबिनेट सचिवपदावर देखील होते. जेव्हा त्यांनी त्यांच्या पदाचा पदभार घेतला होता, तेव्हा 1996 मध्ये त्यांनी सरकारी सेवेत दिलेल्या विशेष योगदानामुळे त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देऊन गौरवले आहे. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील थिरुनेल्लई 15 डिसेंबर 1932मध्ये येथे त्यांचा जन्म झाला. मद्रास ख्रिश्चियन कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवा ते उत्तीर्ण झाले. तसेच अमेरिकेतल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून त्यांनी सार्वजनिक प्रशासना(Public Administration)ची पदवी मिळवली.
 
तामिळनाडूत जन्मलेल्या या अधिका-याने भारतातील निवडणुकीच्या प्रक्रियेत अनेक सुधारणा केल्या. अर्थात शेषन यांना ते करताना प्रचंड विरोधही झाला. सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या निवडणुकीतील आमूलाग्र बदलांना विरोध केला, पण या गृहस्थाने कुठल्याही दबावाला बळी न पडता निवडणुकीत सुधारणा घडवून दाखवल्या, त्यामुळे आज ज्या काही निकोप निवडणुका होत आहेत, त्याचे श्रेय फक्त आणि फक्त टी. एन. शेषन यांच्याकडे जाते. निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी त्यांच्या कार्यकाळापासून सुरू झाली. कधीही, कुठेही, कसाही प्रचार करणे, ध्वनिक्षेपणाचा अमर्यादित वापर अशांमुळे होणारा त्रास, याचा कुठेही विचार केला जात नव्हता, त्यालासुद्धा टी. एन. शेषन यांनीच चाप  वसवला होता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती