नवी मुंबई स्वच्छ शहरांच्या यादीत टॉप टेनमध्ये

देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई टॉप टेनच्या यादीत आहे. नवी मुंबई आठव्या स्थानावर असून पहिल्या स्थान मध्य प्रदेशातील इंदूर या शहराने मिळविला आहे.

केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी ही यादी जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या स्थानवर मध्यप्रदेशातील इंदूर शहर असून अनुक्रमे भोपाळ, विझाग, सुरत, म्हैसूर, तिरुचिरापल्ली, नवी दिल्ली, नवी मुंबई, तिरुपती आणि बडोदा या शहरांचा टॉप टेनच्या यादीत समावेश आहे. तसेच स्वच्छ शहरांमध्ये पहिल्या 50 पैकी 12 शहरे गुजरातमधली आहेत.
 
स्वच्छ सर्वेक्षणात 434 शहरांचा सहभाग होता. दुसरीकडे अस्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील भुसावळ हे दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर उत्तर प्रदेश हे स्वच्छतेच्या बाबतीत सर्वात तळाला आहे. कारण सर्वात अस्वच्छ शहरांमधे 20 शहरे एकट्या यूपीमधली आहेत. यूपीमधील गोंडा हे तर अंतिम क्रमाकांवर आहे.

वेबदुनिया वर वाचा