राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.जयपूरच्या दुदु शहरात तीन महिला आणि दोन मुलांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांना प्रथम दर्शनी आढळले. पण त्यांची हत्या केल्याचा आरोप मयत महिलांच्या चुलत भावाने केला आहे. पैशासाठी त्यांची हत्या करण्याचे भावाचे म्हणणे आहे. त्या नंतर विहिरीतून एकूण 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.मृत्युमुखी पडलेल्या तीनपैकी दोन महिला गर्भवती होत्या.काली देवी(27), मीना(23), कमलेश मीणा(20), हर्षिता(4), आणि 20 महिन्याचा चिमुकला होता.
या तिघींची मेहनतीने आपले शिक्षण पूर्ण केले.कमलेश हिने सेंट्रल युनिव्हर्सिटीत प्रवेश घेला असून ममताची पोलीस कॉन्स्टेबलच्या परीक्षेत निवड झाली होती तर मोठी बहीण कालीदेवी ही बीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. त्यांचे कमी वयातच लग्न लावून दिले. त्यांचे पती अशिक्षित असून दारू पिऊन मारहाण करायचे. त्यांनी वडिलांची संपत्ती देखील विकली आणि दारूच्या आहारी गेले होते. अशिक्षित असल्यामुळे कामालाही जात नव्हते. ते वारंवार आपल्या पत्नीचा माहेरून हुंडा आणण्यासाठी छळ करायचे त्यांना मारहाण करायचे. अखेर त्या बहिणींचे मृतदेह विहिरीत सापडले. या प्रकरणी पोलिसांनी सासरकडील काही लोकांना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास करत आहे. या बहिणींच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.