सोनिया गांधी यांच्या किचन कॅबिनेट मधील एक नेत्या अशीही पाटील यांची ओळख होती. युवा नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नावे चर्चेत होती. मात्र रजनी पाटील यांना संधी देऊन काँग्रेसने एका महिला नेत्याला संधी दिली होती. यापूर्वी त्या ११ व्या लोकसभेत बीडमधून खासदार म्हणून निवडून गेल्या होत्या.