तोपर्यंत भारत सैन्य मागे नाही हटवणार : स्वराज

शुक्रवार, 21 जुलै 2017 (11:09 IST)

सुषमा स्वराजने राज्यसभेत डोकलाममधून तोपर्यंत भारत आपले सैन्य मागे नाही हटवणार जोपर्यंत चीन आपले सैन्य मागे नाही हटवत. चीनने आधी सैन्य मागे घ्यावे मग भारत पुढचे पाऊल घेईल असे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट शब्दात चीनला सांगितले. चीनसोबतच्या विवादात संपूर्ण देश आमच्या सोबत असल्याचे स्वराज यांनी म्हटले.तर चीनची मागणी आहे की, भारताने आपले सैन्य हटवावे असे त्यांनी म्हटले. आम्ही म्हणतोय की, चर्चा करा आणि दोन्ही देशांनी आपले सैन्य हटवावे. ट्राई जंक्शन पॉईंटसंबंधित भारत आणि चीन यांच्यात करार झाला होता त्यानुसार भारत, चीन आणि भूटान मिळून निर्णय घेण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार सुषमा स्वराज यांनी चीनला सुनावले.

वेबदुनिया वर वाचा