सुशांत सिंह राजपूतच्या 5 नातेवाईकांचा रस्ता अपघातात मृत्यू, अंत्यसंस्कार करून कुटुंब पाटण्याहून परतत होते

मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (13:31 IST)
बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात मंगळवारी पहाटे झालेल्या एका रस्ते अपघातात सात जणांना आपला जीव गमवावा लागला. तर चार जण गंभीर जखमी आहेत. मृत्युमुखी पडलेले पाच जण फिल्म अभिनेते सुशांत सिंग राजपूतचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यासह कार चालकाचाही मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील  बळी  झालेले  सुशांतचे मेहुणे  लालजीत सिंग आहे , हे  हरियाणामध्ये एडीजीपी पदावर कार्यरत होते . या अपघातात त्यांची दोन मुले, दोन मुली आणि वहिनी यांचाही जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी वाल्मिकी सिंह यांचा पाटण्याला उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

शेखपुरा-सिकंदरा मार्गावर हलसी पोलीस स्टेशन हद्दीतील पिपरा गावात मंगळवारी सकाळी 6.10 वाजता हा अपघात झाला. यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. ट्रक आणि टाटा सुमो यांच्यात झालेल्या धडकेत सुमो स्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी लखीसराय सदर रुग्णालयात नेण्यात आले आहेत. 

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लालजीत सिंग यांच्या पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी हे सर्वजण पाटण्याला गेले होते. लालजीत सिंग आपल्या संपूर्ण कुटुंबासह पाटण्यात राहत होते. पत्नीच्या निधनानंतर तेराव्याच्या कार्यक्रमासाठी ते गावी जात होते. दोन वाहनांवर कुटुंबाचे एकूण 15 सदस्य होते. त्यातील एक टाटा सुमोचा ट्रक ला धडक होऊन अपघात झाला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती