लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमुखपदी सर्जन व्हाइस ॲडमिरल आरती सरीन

शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (08:41 IST)
लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) संचालक आणि प्रमुखपदी सर्जन व्हाइस ॲडमिरल आरती सरीन यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला.
व्हाइस ॲडमिरल आरती सरीन या एएफएमसीच्या माजी विद्यार्थी असून २६ डिसेंबर १९८५ मध्ये त्यांची सशस्त्र वैद्यकीय सेवांमध्ये (एएफएमएस) नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पुण्यातील एएफएमसीमधून रेडिओडायग्नोसिस आणि मुंबई येथील टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमधून रेडिएशन ऑन्कोलॉजीमधील विशेष प्रावीण्यासह पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. याव्यतिरिक्त पिट्सबर्ग विद्यापीठात गामा नाईफ सर्जरीचे प्रशिक्षण सरीन यांनी पूर्ण केले आहे.
आपल्या ३७ वर्षांच्या सेवा कार्यकाळात त्यांनी महत्त्वाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय नियुक्त्यांवर जबाबदारी पार पाडली आहे. दिल्लीतील आर आर लष्करी रुग्णालय आणि कमांड रुग्णालय, पुण्यातील एएफएमसी येथील रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख, मुंबई येथील आयएनएस अश्विनीच्या कमांडंट या पदांचा समावेश आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती