Surat: रस्त्यावर हिरे लुटण्यासाठी लोकांची गर्दी

सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (13:27 IST)
गुजरातची आर्थिक राजधानी असलेल्या सुरतला डायमंड आणि टेक्सटाईल सिटी म्हणतात. हिऱ्यांची नगरी असल्याने शहरातील महिधरपुरा व वराछा परिसरात भाजी मार्केटप्रमाणे हिरे मार्केट लावले जाते. लोक रस्त्यावर आणि फूटपाथवर बसून हिरे विकत घेतात. वराछा भागातील डायमंड मार्केट नावाच्या मिनी मार्केटमधील रस्त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये हिरे व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावरून हिरे उचलताना दिसत आहेत. 

झाले असे की, दररोजप्रमाणे आज सकाळीही हिरे व्यवसाय करणारे लोक वराच्छा डायमंड मार्केटमध्ये पोहोचले होते. सामान्य नागरिकही मुख्य रस्त्यावरून येत होते  बाजारात हिरे रस्त्यावर पडल्याची बातमी उडाली. लोकांनी पाहिलं तर तिथे खरंच हिरे पडलेले होते. यानंतर बाजारात गोंधळ माजला . 
 
रस्त्यावर पसरलेले हिरे लुटण्यासाठी दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिक आपली कामे सोडून हिरे गोळा करू लागले. अगदी लहान आकाराचे हे हिरे उचलण्यात लहान मुलांमुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी भाग घेतला. स्त्री-पुरुष हिरे उचलताना दिसत होते. अनेकांनी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. डझनभर लोक रस्त्यावरून हिरे उचलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कुणाला एकही हिरा मिळाला नाही तर कुणाला डझनाहून अधिक हिरे मिळाले. बराच वेळ रस्त्यावर हे दृश्य दिसत होते. 
 
उचललेल्या हिऱ्याची तपासणी केली असता सर्वांनाच धक्का बसला. हा हिरा खाणीतून काढलेला खरा हिरा किंवा प्रयोगशाळेत तयार केलेला सीबीडी हिरा नाही, तर हे अमेरिकन हिरे आहेत, ज्यांची किंमत काही खास नाही. असे उघड झाले. कित्येक तास हिरे वेचणाऱ्यांना फसवणूक झाल्याचे जाणवू लागले. 
या घटनेनंतर हिरे व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती