हॉटेल आणि रेस्टॉरंट मिनरल वॉटर अर्थात बादली बंद पाणी आणि इतर खाण्याचे हवाबंद पदार्थ एमआरपीपेक्षा जास्त दराने विकू शकतात, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. हॉटेल मालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ही बाब नमूद केली.
"एखादी व्यक्ती रेस्टोरेंटमध्ये मिनरल वॉटरची बाटली खरेदी करण्यासाठी येत नाही. ती व्यक्ती पाणी तिथेच बसून पिते. हॉटेलच्या वातावरणाचा आनंद लुटतो. टेबल आणि भांड्यांसह हॉटेल स्टाफच्या सेवांचाही वापर करतो. त्यामुळे त्याच्याकडून एमआरपीपेक्षा जास्त पैसे वसूल करणं चुकीचं नाही," असं हॉटेल मालकांच्या याचिकेत म्हटलं आहे.
2015 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला फेडरेशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन्स ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. "2009 च्या लीगल मेट्रोलॉजी अॅक्ट अंतर्गत एमआरपीपेक्षा जास्त पैसे वसू करणाऱ्या हॉटेल-रेस्टॉरंटवर सरकार कारवाई करु शकतं," असा हायकोर्टाने म्हटलं होतं.