चित्रपट गृहात राष्ट्रगीत असावे की नसावे यावर रोज वाद होत असतात, त्यात आता चित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुरु होण्याआधी राष्ट्रगीत लावणं अनिवार्य करण्याची भूमिका केंद्र सरकारने बदलत आहे. केद्र सरकार नुसार आता चित्रपटगृहात सिनेमाआधी सध्या राष्ट्रगीत अनिवार्य करु नये, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. तर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात आज सुनावणी होणार आहे.
केंद्र सरकार स्पष्ट करते की यासाठी आंतरमंत्रालयीन समितीची स्थापना करण्यात आली आहे, ती सहा महिन्यात आपल्या सूचना देईल. यानंतर यासंदर्भात कोणती सूचना किंवा परिपत्रक जारी करायचं की नाही, हे ठरवलं जाईल. या पूर्वी मात्र केंद्र सरकारने यापूर्वी चित्रपटगृह आणि शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करावं, यासाठी सरकार अडून बसले होते.