रावणदहनावर बंदी घालणारी याचिका फेटाळली

मंगळवार, 11 जुलै 2017 (17:04 IST)

दसऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या रावणदहनावर बंदी घालण्याची मागणी करणारी एक जनहित याचिकाफेटाळून लावली. राज्यघटनेने देशातील सर्व नागरिकांना धार्मिक आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, असे कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यासाठी दिले आहे. सरन्यायायाधीश जे.एस. खेहर आणि न्या. डी.वाय. चंद्रचुड यांनी या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्यघटनेतील 25 व्या कलमातील तरतूदींची आठवण करून दिली.

हरियाणातील पत्रकार आनंद प्रकाश शर्मा यांनी रावणदहनाच्या विधीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या प्रथेचा वाल्मिकी रामायण किंवा तुलसी रामायणात कोणताही आधार किंवा समर्थन आढळत नाही, असे शर्मा यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले होते. या प्रथेमुळे हिंदूंमधील एका गटाच्या भावनाही दुखावल्या जातात आणि त्यामुळे पर्यावरणाचेही नुकसान होत असते, असाही दावा या याचिकेमध्ये करण्यात आला होता.

वेबदुनिया वर वाचा