Rahul Gandhi news : रॅलीमध्ये अमित शहा यांच्याविरुद्ध केलेल्या कथित वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्याच्या कार्यवाहीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्ध कथित अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यातील कनिष्ठ न्यायालयाच्या कार्यवाहीला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नवीन झा यांनी 2019मध्ये राहुल गांधी यांच्यावर शहा यांच्याविरुद्ध केलेल्या कथित टिप्पणीबद्दल खटला दाखल केला होता. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एका भाषणात, राहुल गांधी यांनी शाह यांच्यासाठी 'किलर' हा शब्द वापरल्याचा आरोप आहे. राहुल गांधी यांच्या अपीलावर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने झारखंड सरकार आणि भाजप नेत्यांना नोटीस बजावली आहे आणि त्यांचे उत्तर मागितले आहे. तसेच खंडपीठाने म्हटले, "नोटीस जारी करावी." पुढील आदेश येईपर्यंत खटल्याची पुढील कार्यवाही स्थगित राहील.