फडणवीस विधानसभेत खोटे बोलले,राहुल गांधींचा परभणीतून मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला

सोमवार, 23 डिसेंबर 2024 (17:54 IST)
परभणीत हिंसाचार झाला. त्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट आज सोमवारी राहुल गांधी यांनी घेतली.या वेळी राहुल गांधी यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. 

राहुल गांधी यांच्या सोबत नानापटोले देखील उपस्थित होते. या भेटीत राहुल गांधी यांनी प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल, व्हिडीओ आणि छायाचित्रे देखील पाहिली. ते बघता राहुल गांधी म्हणाले, या मध्ये 100 टक्के दर्शविले आहे की कोठडीत असतानांच सोमनाथ यांचा मृत्यू झाला.त्यांची हत्या झाली असून या हिंसाचाराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. 

सोमनाथ यांची हत्या झाली आणि मारहाण केली. कारण ते दलित होते. आणि संविधानाचे रक्षण करत होते. या वरून दिसून येते की मुख्यमंत्री विधानसभेत खोटे बोलले आहे. 

राहुल गांधी पुढे म्हणाले की, आरएसएसची विचारधारा ही राज्यघटना नष्ट करण्याची आहे. हे प्रकरण तात्काळ सोडवावे आणि ज्यांनी हे कृत्य केले त्यांना शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. यात राजकारण नाही... विचारधारा जबाबदार आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले आहे, त्यामुळे मुख्यमंत्री जबाबदार आहेत, ज्यांनी त्यांची हत्या केली ते जबाबदार असून लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे.”असे ते म्हणाले. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती