राजस्थानमधील कोचिंग नागरी कोटा मध्ये विद्यार्थ्यंच्या आत्महत्येचे सत्र थांबत नसून दिवसेंदिवस वाढतच आहे. कोटा मध्ये परत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. सात दिवसांमध्ये ही दुसरी घटना आहे. कोटा मधील महावीर नगरमध्ये राहत असलेला व JEE परीक्षेची तयारी करीत असलेला सोळा वर्षाच्या विद्यार्थ्याने फाशी लावली आहे.
पोलीस अधिकारींनी सांगितले की, हा विद्यार्थी खाजगी कोचिंग मध्ये JEE ची तयारी करीत होता. तसेच दोन वर्षांपासून आपल्या मोठ्या भावासोबत राहत होता. तसेच अधिकारींनी सांगितले की, या विद्यार्थ्यांचे आई-वडिल चार पाच वर्षांपूर्वी वारले आहे. तर काका या दोघी भावांना शिकवत होते व त्यांचे पालनपोषण करीत होते.