सामान्य व्यक्ती केंद्र सरकारसाठी काम करून 20 हजार रूपयांपर्यंत कमावू शकणार आहे. सरकार कॅशलेस व्यवहारांना चालना मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी दोन टास्कचं आयोजन करण्यात आलं आहे. यात सरकारने 'डिजीटल पेमेंट अवेअरनेस' प्रोग्रामचं आयोजन केलं आहे. या प्रोग्रामसाठी केंद्र सरकारला सिग्नेचर टोन, लोगो आणि टॅगलाइन तयार करायची आहे.
सर्वात चांगली सिग्नेचर टोन बनवणा-याला 10 हजार रूपयांचं बक्षिस दिलं जाईल. त्या खालोखाल इतर दोन टोन बनवणा-यांना अनुक्रमे 5 हजार आणि 3 हजार रूपयांचं बक्षिस देण्यात येणार आहे. लोगो आणि लाईनच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वात चांगल्या टॅगलाइनला 20 हजार रूपयांचं बक्षिस दिलं जाईल. दुस-या क्रमांकावरील व्यक्तीला 15 हजार आणि तिस-या क्रमांकाला 7 हजार 500 रूपयांचं बक्षिस देण्यात येणार आहे.