रास्तभाव दुकानांतून आता साखर गायब

शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (16:11 IST)

आता फक्त अंत्योदय योजनेतील गरिबातील गरीब कुटुंबांना साखर मिळणार आहे. मात्र त्याचाही दर पाच रुपयांनी वाढविण्यात आला आहे. साखरेचा कोटा कमी केल्यामुळे या योजेनीतील कुटुंबांना महिन्याला फक्त एकच किलो साखर मिळणार आहे.केंद्र सरकारने अनुदान बंद केल्याने राज्यातील दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल) सुमारे ४५ लाख कुटुंबांना रास्तभाव दुकानांतून मिळणारी साखर बंद करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. 

केंद्र सरकारकडून बीपीएल व अंत्योदय कुटुंबांना स्वस्त दरात साखर वितरित करण्यासाठी अनुदान मिळत होते, परंतु केंद्राने आता फक्त अंत्योदय योजनेतील कुटुंबांनाच अनुदान दिले जाईल, असे राज्य सरकारला कळविले. केंद्र सरकारने अनुदान बंद केल्याने त्याचा ४५ लाख बीपीएल कुटुंबांना फटका बसला आहे. त्यांना रास्तभाव दुकानांतून आता साखर मिळणार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती